अरिजीत सिंगची प्रकृती खालावली, अनेक कॉन्सर्ट रद्द
मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. प्रकृती खालावल्यामुळे गायकाने ब्रिटेन याठिकाणी होणारा कॉन्सर्ट रद्द केला आहे. गायकाने अनेक कॉन्सर्ट रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.
अरिदीत याने सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर करत प्रकृती स्थिर नसल्याची माहिती दिली आहे. कॉन्सर्ट अचानक रद्द केल्यामुळे अरिजीत याने खंत देखील व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अरिजीत याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
अरिजीत सिंग याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत गायकाने कॅप्शनमध्ये 'महत्त्वपूर्ण अपडेट आणि सूचना…' असं लिहिलं आहे. 'सर्व चाहत्यांना एक गोष्ट सांगताना दुःख होत आहे, काही वैद्यकीय परिस्थितींमुळे ऑगस्टमध्ये होणारे सर्व कॉन्सर्ट रद्द करावे लागत आहे. मला माहिती आहे शोसाठी तुम्हा सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे आणि कॉन्सर्ट होत नसल्यामुळे मला दुःख होत आहे. तुमचं प्रेम माझी शक्ती आहे.'
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 02-08-2024
What's Your Reaction?