इंडियन मेडिकल असोसिएशनच्या चिपळूण अध्यक्षपदी डॉ. अब्बास जबले यांची निवड

Aug 3, 2024 - 10:15
 0
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या चिपळूण अध्यक्षपदी डॉ. अब्बास जबले  यांची  निवड

चिपळूण : वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करणारे डॉ. अब्बास जबले यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. बुधवारी शहरातील हॉटेल रूपटॉपच्या सभागृहात झालेल्या सभेत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

गेली अनेक वर्ष डॉ. जबले हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. तालुक्यातील मुळचे कालुस्ते येथील रहिवासी असलेले डॉ. जबले यांनी १९९३ पासून वैद्यकीय क्षेत्रात कामकाज सुरू केले. त्यानंतर २००२ मध्ये ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य झाले. याचवेळी ऑर्थोपेडिकसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनची ही सभा डॉ. रत्नाकर घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून डॉक्टर विजय रेडकर यांनी काम पाहिले. व्हाईस प्रेसिडेंट म्हणून डॉ. विकास जोगळेकर, सेक्रेटरी डॉ. अरविंद पोतदार, डॉ. मुस्ताक मुकादम, खजिनदार डॉ. अजय सानप तसेच कमिटी सदस्य म्हणून डॉ. समीर दळवी, डॉ. मंजूर मणियार, डॉ. अविनाश पवार, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. भाले, डॉ. ओंकार शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याचबरोबर महिला अध्यक्ष डॉ. मनीषा वाघमारे, व्हाईस प्रेसिडेंट डॉ. वनिता सानप व सचिवपदी डॉ. अनुपमा जोशी यांची निवड करण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow