चिपळूण : आ. शेखर निकम यांच्यावरील आरोप तथ्यहीन; उदय ओतारी यांचा साजिमद सरगुरोह यांना टोला

Jun 1, 2024 - 13:29
Jun 1, 2024 - 13:31
 0
चिपळूण : आ. शेखर निकम यांच्यावरील आरोप तथ्यहीन; उदय ओतारी यांचा साजिमद सरगुरोह यांना टोला

चिपळूण : काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष साजिमद सरगुरोह यांनी आमदार शेखर निकम चिपळूण शहराच्या विकासाबाबत गंभीर नसल्याचे केलेले आरोप तथ्यहीन असून आ. शेखर निकम यांनी चिपळूण शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच शहराच्या विकासासाठी सुमारे ११६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यातून येत्या काळात शहराच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे. तरी साजिद सरगुरोह यांनी आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहरासाठी दिलेल्या योगदानाची माहिती घ्यावी नंतरच आ. निकम यांच्यावर आरोप करावेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूणचे माजी शहराध्यक्ष उदय ओतारी यांनी हाणला आहे. तसेच सरगुरोह यांनी केलेल्या आरोपांच्या मुद्यांचे जोरदारपणे खंडन केले आहे.

यावेळी ते म्हणाले की, चिपळूण बस स्थानकाचे काम सुरुवातीला रखडले होते. ही वस्तुस्थिती खरी आहे. मात्र, आता दुसरा ठेकेदार नेमण्यात आला असून या ठेकेदाराच्या माध्यमातून या बसस्थानकाच्या कामाने वेग घेतला आहे, याची माहिती सरगुरोह यांनी घ्यावी, असे केले. त्यांनी यावेळी स्पष्ट शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप मुरादपूर उक्ताड या भागातील पाणी प्रश्नासाठी आ. निकम यांनी प्राधान्य दिले असून
गांधारेश्वर मंदिर येथे जॅकवेल बांधणीसाठी निधी मंजूर करून घेतला असून या जॅकवेलसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या एकात्मिक शहर विकास योजनेतील गाळे मालमत्ता दीर्घ तीस वर्ष मदतीच्या भाडेतत्त्वावर देण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. यासाठी आ. निकम यांनीच पुढाकार घेतला आहे. यामध्ये मच्छी मटण मार्केट, भाजी मंडई, गोवळकोट येथील कॅन्टीन यांचा समावेश आहे.

शहरातील एन्रॉन पुलासंदर्भात देखील केलेला आरोप तथ्यहीन असून या पुलाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा पूल वाहतुकी योग्य होईल, अशी माहिती उदय ओतारी यांनी यावेळी दिली. आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहराच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून सुमारे ११६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात यश मिळवले आहे. या निधीच्या माध्यमातून काही कामे पूर्ण झाली आहेत. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे येत्या कालखंडात चिपळूण शहराच्या विकासात नक्कीच भर पडलेली दिसेल, असा विश्वास ओतारी यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी आमदार शेखर निकम यांनी केलेल्या विकासकामांच्या योगदानाची माहिती घ्यावी. नंतरच आरोप करावेत, असा टोला हाणला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 01/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow