राजापुर : गणेश सजावट स्पर्धेत संकेत भांबळे यांचा देखावा प्रथम

Sep 19, 2024 - 11:30
Sep 19, 2024 - 13:33
 0
राजापुर : गणेश सजावट स्पर्धेत संकेत भांबळे यांचा देखावा प्रथम

राजापूर : जागृत सेवा मंडळ, गांगणवाडीच्या वतीने ओणी पूर्व विभाग मर्यादित आयोजित इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धेत ताम्हाणे येथील संकेत भांबळे यांनी साकारलेल्या देखाव्याला प्रथम क्रमांक देण्यात आला. मिळंद येथील सीताराम गजापकर आणि रायपाटण येथील चदि परिवार यांच्या देखाव्याला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाले. जिजामाता विद्या मंदिर राय पाटणच्या स्व. सौ. अरुणा अनंत शेठ गांगण सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा झाला.

एकूण १६ ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. जागृत सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात सहभागी स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षण करण्यात आले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच झाला. यावेळी सरपंच नीलेश चांदे, राजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश पराडकर, रायपाटणचे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रभाकर पळसुले देसाई, जागृत सेवामंडळाचे अध्यक्ष सुधीर गांगण उपस्थित होते. प्रथम क्रमांक विजेत्याला रोख रुपये ७,७७७ आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला रोख रुपये ५,५५५ आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकाला रोख रुपये ३.३३३ आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow