रोटरी क्लब ऑफ, रत्नागिरी आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Aug 5, 2024 - 09:50
 0
रोटरी क्लब ऑफ, रत्नागिरी आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरीमधे शासकीय रुग्णालयात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता व रुग्णाची मोठी गैरसोय होत होती. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी,"कर्तव्य"  भव्य रक्तदान शिबिर दैवज्ञ भवन, पॉवर हाऊस, नाचणे रोड, रत्नागिरी येथे आयोजित केले होते. तसेच तमाम नागरिकांना रक्तदान करणे बाबत आवाहन करण्यात आले होते.

सदर रोटरी क्लबचा आवाहनाला रत्नागिरीकरानी प्रचंड प्रतिसाद दिला. महिला वर्गाची उपस्थितीसुद्धा उल्लेखनीय होती. एकूण २४० रक्तदाते शिबिराला उपस्थित होते व १८५ रक्तबॅग यूनिट रक्त रत्नागिरी शासकीय रुग्णालय व धन्वंतरी धर्मदाय संस्था यांना सुपूर्त करण्यात येऊन शिबिर भव्य व दिव्य संपन्न झाले. 

शिबिर यशस्वी करणे साठी रोटरी क्लबचे अध्यक्ष रूपेश पेडणेकर, शिबिराचे इवेंट चेअर धीरज वेल्हाळ, सचिव ॲड.मनिष नलावडे, खजिनदार माधुरी कळंबटे तसेच रोटरी क्लबचे सर्व सदस्य यांनी प्रचंड मेहनत घेतली. शिबीराचे समारोपाचे वेळी रत्नागिरीमधे ज्यावेळी रक्ताबाबत गरज भासेल त्यावेळी रोटरी क्लब असे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करेल, असे रोटरी क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. रूपेश पेडणेकर यांनी सांगून सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow