...तर नारायण राणे यांची कोकणात फजिती करू; मनोज जरांगेंचा इशारा

Aug 5, 2024 - 11:26
 0
...तर नारायण राणे यांची कोकणात फजिती करू; मनोज जरांगेंचा इशारा

जालना : आपण ठरविले तर नारायण राणे यांना कोकणातही फिरता येणार नाही, त्यांची फजिती होईल. त्यामुळे नीलेश राणे यांनी त्यांच्या वडिलांना समजावून सांगावे, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

खा. नारायण राणे यांनी गणेशोत्सवानंतर आपण मराठवाड्यात भाजपची घेऊन दौरा करणार आहोत. बघू  भूमिका जरांगे काय करतात, असे वक्तव्य केले, त्यावर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. आपण नारायण राणे यांना मराठवाड्यात येऊ नका, असे बोललोच नाही. ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी आहे, असा सवाल जरांगे यांनी केला. २० सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, हा विषय कन्फ्यूज करणारा आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या विधानसभा मतदारसंघाचा १४ ते २० ऑक्टोबरपर्यंत डाटा आणावा. आमचीही तयारी सुरु झाली आहे. जे उमेदवार असतील त्यांनी कागदपत्रे काढू 5655 ठेवा. २९ ऑगस्टला पाडायचं की लढायचं हे ठरणार आहे, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सभेला तसेच कार्यक्रमात मराठ्यांनी जाऊ नये, यांच्या रणधुमाळीत मराठे दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow