SET Result 2024 : सेट परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यभरातून 7,273 विद्यार्थी उत्तीर्ण

Aug 6, 2024 - 10:18
 0
SET Result 2024 : सेट परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यभरातून 7,273 विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) वतीनं महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा ( Maharashtra SET) म्हणजेच सेट परीक्षेचा काल जाहीर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं परीक्षा 7 एप्रिल रोजी आयोजित केली होती.

या परीक्षेचा निकाल थोड्याच वेळापूर्वी जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा दिली होती. ते सेट विभागाच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. 39 व्या सेट परीक्षेत 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 39 व्या सेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा 7 एप्रिल रोजी राज्यभरातील विविध शहरातील परीक्षा केंद्रांवर पार पडली होती. विद्यापीठाच्या सेट विभागानं दिलेल्या माहितीप्रमाणं परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 9 हजार 250 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सेट विभागाकडून 5 ऑगस्ट म्हणजे आज सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 6.66 टक्के इतका निकाल सेट परीक्षेचा लागला आहे.

सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षेच्या वेबसाईटवरुन ई-प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घ्यावं लागेल. याशिवाय सेट विभागानं अंतिम उत्तर तालिका देखील जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांच्या अर्ज दाखल करताना अर्जात काही त्रुटी असतील तर त्या 500 रुपये शुल्क आणि योग्य पुरावे सादर केल्यानंतर दुरुस्त केल्या जातील.

निकाल कुठं पाहणार?

सेट परीक्षा एकूण 32 विषयांमध्ये आयोजित करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्याची कार्यकक्षा असणाऱ्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.सेट विभागाची वेबसाईट https://setexam.unipune.ac.in/Result.aspx इथं निकाल पाहता येईल.

ऑफलाईन पद्धतीनं शेवटची परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून आतापर्यंत 39 सेट परीक्षांचं आयोजन कण्यात आलं आहे. यापूर्वी 38 परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं झाल्या होत्या. यूजीसीच्या आदेशाप्रमाणं शेवटची ऑफलाईन परीक्षा 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुढील परीक्षा 2025 मध्ये होणार आहे. ती परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. यासंदर्भात सेट विभागानं यापूर्वीच पत्रक काढून विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे.

सेट परीक्षेचा निकाल कसा पाहणार?

स्टेप 1 : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी https://setexam.unipune.ac.in/Result.aspx या वेबसाईटला भेट द्या

स्टेप 2: परीक्षेची तारीख आणि वर्ष निवडा

स्टेप 3 : परीक्षा क्रमांक, नाव, जन्म दिनांक आणि मोबाईल क्रमांक नोंदवा

स्टेप 4: यानंतर सबमिट करा, तुम्हाला निकाल उपलब्ध होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 06-08-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow