रत्नागिरी : सोमेश्वर मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्याची शेकडो वर्षांची प्रथा

Aug 6, 2024 - 10:15
 0
रत्नागिरी : सोमेश्वर मंदिराचा गाभारा पाण्याने भरण्याची शेकडो वर्षांची प्रथा

रत्नागिरी : तालुक्यातील सडये, पिरंदवणे आणि वाडाजून या गावांत श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्रामदैवत श्री देव सोमेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी भरून (देवाला बुडवून) ते पाणी सोडून देऊन व आरत्या करून श्रावणोत्सवाला प्रारंभ झाला. श्रावणाच्या दुसऱ्या दिवशीही असेच केले जाते व त्यानंतर रूद्रपठणासह संततधार सुरू होणार आहे. गेले शेकडो वर्षांची ही प्रथा आजही जपली जात आहे.

सोमवारी सकाळी ६:३० ते ७:१५ वाजेपर्यंत गाभारा भरून पूर्ण झाला. त्यानंतर आरती होऊन पाणी सोडले. भाविकांकडून विहिरीतून कळशा भरून ते गाभाऱ्यात नेऊन ओतण्यात आले. पाणी भरण्यासाठी अंदाजे ७०० ते ८०० कळशा पाणी लागते; पण किती ते कोणीही मोजत नाही आणि मोजू नये, अशी प्रथा आहे. श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी पण असाच देव बुडवून पाणी सोडले जाते आणि मग लगेच संततधार चालू होते. साधारण गावकरी येऊन दोन तास पाणी घालायची सेवा करतो. मंदिरात गोकुळाष्टमी उत्सव साधारण १६४ व्या वर्षी साजरा होणार असून, या वेळी गोफ, टिपऱ्यासारख्या खेळांसह जुन्या गाण्यांचा वारसा जपला जातो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 06/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow