खेड : सहाय्यक निबंधक कार्यालय माहिती देत नसल्याने दीपक मोहितेंचे उपोषण

Aug 6, 2024 - 11:39
 0
खेड : सहाय्यक निबंधक कार्यालय माहिती देत नसल्याने दीपक मोहितेंचे उपोषण

खेड : येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात माहितीचा अधिकार वापरून मागितलेली माहिती दिली जात नसल्याने दि. १५ रोजी खेड तहसीलदार कार्यालय आवारात एक दिवसीय उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक मोहिते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

दीपक मोहिते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्यानुसार त्यांनी दि.६ नोव्हेंबर रोजी माहिती अधिकाराचा वापर करून खेड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सन २००० ते २०२४ पर्यंत कालावधीतील पतसंस्थांचे लेखा परीक्षण अहवाल मागणी केली होती.

परंतु ही माहिती देण्यात आली नाही. याबाबत जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई संबंधितांवर झाली नसल्याने या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी दि. १५ रोजी खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे नमूद केले आहे.

या निवेदनाची प्रत दीपक मोहिते यांनी सहकार आयुक्त पुणे, विभागीय सह निबंधक कोकण, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उपविभागीय अधिकारी खेड, तहसीलदार खेड, पोलिस निरीक्षक खेड यांना दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 06/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow