खेडमध्ये ४६ शाळा-महाविद्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे

Aug 27, 2024 - 11:50
Aug 27, 2024 - 11:52
 0
खेडमध्ये ४६ शाळा-महाविद्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे

खेड : बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेनंतर शालेय विद्याथ्यर्थ्यांसह विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शैक्षणिक संस्थांसह शाळा महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. तालुक्यात केवळ ४६ शाळा महाविद्यालयांमध्येच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असल्याची बाब समोर आली आहे.

अत्याचार प्रकरणानंतर अन्य शाळा-महाविद्यालयांसह खासगी संस्थांच्या विद्यालयांकडूनही शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. या घटनेपूर्वी शाळा- महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यासाठी दिरंगाई करणाऱ्यांना शासनाने चपराक लगावली आहे. तालुक्यातील काही शिक्षणसंस्थांच्या खासगी विद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 'नजर' आहे. शाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केल्याने प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी शाळा-महाविद्यालये पुढे सरसावली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow