रत्नागिरी : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बंदने कामकाज ठप्प

Aug 7, 2024 - 10:06
 0
रत्नागिरी  : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बंदने कामकाज ठप्प

रत्नागिरी : प्रगती आश्वासित योजना, कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदप्रमाणे वेतन, सॅनिटर इन्स्पेक्टरांना नियुक्त्या अशा प्रलंबित १४ मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांच्याबरोवर २० मार्च २०२३ ला झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला होता; पण आपल्याच अधिकाऱ्यांनी त्याला हरताळ फासले. अशा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी काल पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. आंदोलनामध्ये ३५० कर्मचारी सामील झाले. त्यामुळे पालिकेचे कामकाज ठप्प झाले, पाणी, अग्निशमन, आरोग्यसेवा सुरू आहे; परंतु शहरातील सुमारे २२ टन घनकचरा काल उचललेला नाही. 

कामबंद आंदोलनानंतरही शासनाने यावर तोडगा काढला नाही, तर बुधवारी (ता. ७) नवी मुंबई ते मंत्रालय या दरम्यान लाँगमार्च काढण्यात येणार आहे. रत्नागिरी पालिकेचे सर्व विभागाचे कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कर्मचारी, कायम कर्मचारी असे ३५० कर्मचारी, अधिकारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते. अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कर्मचारी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत कर्मचा-यांनी पालिकेसमोर निदर्शन केली, कामबंद आंदोलनामुळे पालिकेच्या नियमित कामकाजावर मोठा परिणाम झाला, एकही कर्मचारी कार्यालयात नसल्याने कामकाज ठप्प झाले, अत्यावश्यक सेवा म्हणून पाणी, अग्निशमन विभाग आणि दवाखाने सुरू ठेवण्यात आले आहेत: मात्र शहरातील कचरा काल उचलण्यात  आलेला नाही. दिवसाला सुमारे २१ से २२ टन कचरा संकलित केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणातील कचरा पडून आहे. कंचरा उचलण्याबाबत आणखी दोन दिवसांनी निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

गुरुवारी होणार बैठक
याबाबतचे निवेदन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोकण युनिट रत्नागिरीतर्फे देण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याबाबत प्रयत्न केले. ८ तारखेला याबाबत बैठक होणार असल्याचे समजते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow