रत्नागिरी : जिल्हा बॅंक, पतसंस्थांतर्फे आज तिरंगा रॅली

Aug 14, 2024 - 09:59
 0
रत्नागिरी : जिल्हा बॅंक, पतसंस्थांतर्फे आज तिरंगा रॅली

रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरातील पतसंस्थांचे प्रतिनिधी व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे कर्मचाऱ्यांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे.

बुधवारी (ता. १४) सकाळी ९.१५ वाजता रॅली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणातून निघून त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयस्तंभ येथे रॅली येईल. त्यानंतर रॅलीची सांगता होईल. आपल्या पतसंस्थेचा फलक आणि तिरंगा ध्वज घेऊन या रॅलीत सहभागी व्हावे. या रॅलीमध्ये जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे सहभागी होणार आहेत. सर्व संस्थांनी आपले पदाधिकारी संचालक आणि कर्मचारी यांनी रॅलीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व जिल्हा बॅंक संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 14-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow