लांजा : माचाळ पर्यटस्थळावर हुल्लडबाजी करणा-यांविरुद्ध होणार कड़क कारवाई

Aug 8, 2024 - 11:03
 0
लांजा : माचाळ पर्यटस्थळावर  हुल्लडबाजी करणा-यांविरुद्ध होणार कड़क कारवाई

लांजा : लांजा तालुक्यातील समुद्रसपाटीपासून ४ हजार फुटांवर असलेल्या माचाळ या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी मद्यप्राशन आणि सार्वजनिक शांतता भंग करणा-यांविरुद्ध लांजा पोलिसांनी कड़क कारवाई करण्याचा फलक माचाळ येथे लावला आहे. माचाळ रस्ता हा खोल दरीचा आणि दाट धुक्याचा असल्याने सेल्फी काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

सेल्फीच्या नादात विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. हे लक्षात घेऊन लांजा पोलिसांनी खबरदारी म्हणून लांजा पोलिसांनी माचाळ येथे फलक लावून पर्यटकांना तंबी दिली आहे. हे पर्यटनस्थळ थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित केलेले नाहे. तेथील रस्ता अरुंद आणि चढ-उताराचा असल्याने एका बाजूला दरी आहे. त्या रस्त्यावर दरडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी आपली वाहने मर्यादित वेगाने चालवावीत. माचाळ मार्गावर खोल दरी असल्यामुळे सेल्फी काढू नये, सावधगिरी बाळगावी, अशा सूचना दिलेल्या आहेत. माचाळ मार्गावर वाहन चालवताना मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास मोटारवाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल. माचाज पर्यटन ठिकाणी दारू पिउन कोणी पर्यटकांनी शांतताभंग केल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना लांजा पोलिसांनी दिल्या आहेत. लांजा पोलिस ठाणे यांनी संकटकालीन संपर्क क्रमांक दिले आहेत. दरम्यान, गेल्या महिन्याभरात रत्नागिरी जिल्हासह परजिल्ह्यातील अनेक पर्यटक माचाळवर हजेरी लावत आहेत. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांचा राबता अधिक असतो. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षितता बाळगली आहे.

माचाळ या ठिकाणी पर्यटनासाठी येत असताना काही पर्यटक गावात येईपर्यंतच मद्यधुंद अवस्थेत असतात. अशांना रोखने आम्हाला कठीण होते पण आम्ही त्यांना सेल्फी पॉईंट येथे काळजी घ्या, दारू पिऊ नका, असे सांगूनही ते ऐकत नाहीत. लांजा पोलिसांनी लावलेला फलक हा पर्यटकांसाठी आपली मर्यादा सांगणारा आहे. - गौरव भोसले, माचाळ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow