फाटक हायस्कूलमध्ये क्रिकेट प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद

Jul 10, 2024 - 16:36
 0
फाटक हायस्कूलमध्ये क्रिकेट प्रशिक्षण शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : शहरातील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमध्ये क्रिकेट प्रशिक्षण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. याचे उद्घाटन फाटक प्रशालेचे मुख्याध्यापक राजन कीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक भेलेकर सर, चवेकर सर व प्रशिक्षक  प्रतीक भुर्के उपस्थित होते.

या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना फलंदाजी विश्लेषण, गोलंदाजी विश्लेषण, सामन्यांचा सर्वांगीण अभ्यास, फिटनेस, शारीरिक व मानसिक प्रशिक्षण यांचे मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी या शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले. या शिबिरात पावस, हातखंबा, वरवडे या ठिकाणाहून विद्यार्थी येत होते. 

शाळेचा माजी विद्यार्थी व सध्या क्रिकेट क्लब ऑफ पठाण येथे मुख्य प्रशिक्षक (विझ स्पोर्ट्स मुंबई) असलेला प्रतीक भुर्के याने प्रशिक्षण दिले. प्रशस्तीपत्रकाचे वाटप करण्यात आले. या समारंभाला विद्यार्थी, पालक उपस्थित होते. पुढील वाटचालीसाठी व शाळेच्या क्रिकेट संघासाठी कीर सरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक अजित चवेकर व प्रतीक भुर्के यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:06 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow