संगमेश्वर : खोट्या जाहिरातींच्या फसवणुकीला बळी पडू नका : प्रा. प्रवीण जोशी
सावर्डे : विद्यार्थ्यांनी भविष्यातील एक जागरूक ग्राहक बनले पाहिजे. फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. खोट्या जाहिरातींना बळी पडून स्वतःची फसवणूक कशी टाळता येईल व फसवणूक झालीच तर त्यापासून संरक्षण करण्याचा कायदेशीर मार्ग कोणता याची प्रत्येक विद्यार्थ्यांला माहिती पाहिजे, असे आठल्य-सप्रे पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. प्रवीण जोशी यांनी सांगितले. त्यासाठी प्रत्येकाने दुकानदारांचे गिऱ्हाईक बनण्याऐवजी ग्राहक बनावे, असेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माखजन (ता. संगमेश्वर) येथील अॅड. पी. आर. नामजोशी कनिष्ठ महाविद्यालमध्ये ग्राहक कायदे व हक्क या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविक अखिल भारतीय ग्राहक पंचायत संगमेश्वर तालुकाध्यक्ष दीपक पोंक्षे यांनी केले. सूत्रसंचालन महादेव शिंदे व महादेव परब यांनी तर आभार पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 08/Aug/2024
What's Your Reaction?