लांजा : कार व दुचाकी अपघातात तिघेजण गंभीर जखमी

Sep 16, 2024 - 12:23
 0
लांजा : कार व दुचाकी अपघातात तिघेजण गंभीर जखमी

लांजा : कार व दुचाकी यांच्यामध्ये समोरा समोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.४५ वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर देवधे धनावडे शेती फार्म येथे घडली. जखमींमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या १२ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

अपघातात दुचाकीवरील जखमी झालेल्या पति-पत्नी व मुलाला रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. स्वप्नील जयप्रकाश चव्हाण (वय ३७ वर्षे, रा. कर्ली रत्नागिरी), सोनाली स्वप्नील चव्हाण (वय ३४ वर्षे, रा. कर्ली, रत्नागिरी), सूजन स्वप्नील चव्हाण (वय-१२ वर्षे, कर्ली, रत्नागिरी) सर्वेश स्वप्नील चव्हाण (वय-४ वर्षे, कर्ली, रत्नागिरी) अशी जखमीची नावे आहेत. या अपघाताबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी कार चालक राजेंद्र सत्यनारायण शाहू वय ४३, रा. भोईसर, मुंबई) हा आपल्या ताब्यातील कार (एम एच ४८, क्र. सीसी- ४४८२) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून लांजा येथील आपल्या मित्राकडे येत होता. मुंबई येथून लांजा येथे देण्यासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजता निघाला होता. ही गाडी मुंबई- गोवा महामार्गावरील देवधे धनावडे शेती फार्म येथे सकाळी ८.४५ वाजण्याच्या दरम्यान आली असता समोरून लांजा रत्नागिरीच्या दिशेने जाणारी दुचाकी स्प्लेन्डर (एम एच ०८, ए.जे ०९३४) यांच्यामध्ये समोरा समोर जोरदार धडक बसली. यावेळी दुचाकी चालक स्वप्नील चव्हाण व त्यांच्या मागे बसलेली त्याची पत्नी सोनाली चव्हाण व त्यांची दोन मुले श्रुजन व सर्वज्ञ हे महामार्गावर जोरदार आदळले. यामध्ये स्वप्नील यांच्या पायाला तर पत्नी सोनाली हिच्या डोक्याला व पायला गंभीर दुखापत इाली आहे. यासह १२ वर्षीय सृजन याच्या पायाचा अंगठा तुटला आहे. या अपघातात जखमी झालेल्या पती-पत्नी व मुलगा अशा तिघांनाही रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow