मंडणगड : डॉ. आंबेडकर हायस्कूलच्या संगणक कक्षाला आग

Aug 9, 2024 - 09:32
 0
मंडणगड : डॉ. आंबेडकर हायस्कूलच्या संगणक कक्षाला आग

मंडणगड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या संगणक कक्षाला बुधवारी मध्यरात्रीनंतर 1 शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. यामध्ये इमारतीचे छत व आतील दोन संगणक मिळून ३ लाख १९ हजारांचे नुकसान झाले.

या परिसरातील नागरिक रुपेश घोसाळकर यांना शाळेच्या खोलीतून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी नगरसेवक विनोद जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. विनोद जाधव आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी आले. बाजूला असलेले दिनेश राठोड यांनी पाणी उपलब्ध करुन दिले. विनोद जाधव, दिनेश राठोड, वाहतूक पोलीस माने, मंडल अधिकारी निलेश गोडघासे, सागर सापटे, नागेश घोसाळकर, वायरमन जावळे, लेखनीक विलास जाधव, प्रशालेचे सर्व कर्मचारी व शहरातील नागरिक यांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली.

तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने याची दखल तातडीने घेत मदत कार्यात सहभाग नोंदविला. याशिवाय गुरुवारी मंडल अधिकारी निलेश गोडघासे, तलाठी सय्यद यांनी नुकसानीचा पंचनामा केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळास भेट दिली.

३ लाख १९ हजारांचे नुकसान
महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात संगणक कक्ष ४ नग २ लाख ७० हजार, लोखंडी कपाट २ नग ३० हजार, लोखंडी रैंक १ नग ५ हजार, आय.सी.टी. साहित्य २ हजार, लाकडी खिडकी ५ हजार, कौले २००, ४ हजार, कोन १०, ५०० रुपये, वासे ५, २५०० रुपये असे ३ लाख १९ हजार झाल्याची नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow