रत्नागिरी : निवळी रावणंगवाडीतील अंडर पास मार्ग बनवून देऊ : पालकमंत्री उदय सामंत

Aug 5, 2024 - 10:38
Aug 5, 2024 - 11:41
 0
रत्नागिरी : निवळी रावणंगवाडीतील अंडर पास मार्ग बनवून देऊ : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : निवळी रावणंगवाडीचा अंडर पास हा दुसरा कोणी नाही, तुमचा उदय सामंतच करून देईल. तुमच्या गावाच्या विकासाची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

निवळी येथे आयोजित संवाद कार्यक्रमात पालकमंत्री सामंत बोलत होते. या वेळी ते म्हणाले, गावभेट कार्यक्रमानिमित्ताने निवळी गावात येण्याचा योग आला. लोकसभेला महायुतीला निवळीतुन मतदान होणे अपेक्षित होते. मात्र काय झाले ते समजलेले नाही. परंतु विधानसभा निवडणुकीत निवळीसीयांचा आशीर्वाद राहिल, असा विश्वास आहे. गावातील विविध विकासकामे होत आहेत. मी तुमच्या प्रत्येक संकटात तुमची ढाल बनून उभा आहे. लोकसभेला खासदार नारायण राणे यांना मतदान होणे अपेक्षित होते. मात्र काय झाले हे समजले नाही. 

परंतु विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे. या निवडणुकीत आपण आशीर्वाद द्याल हिच अपेक्षा आहे. सरकारच्या योजना घराघरात पोचण्यासाठी बाहेर पडून प्रत्येकाने कामाला लागा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारची योजनेच्या माध्यमातून दुवा घेण्याचे काम करू या असे आवाहन सामंत यानी केले. या वेळी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, युवासेना तालुका प्रमुख तुषार साळवी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, प्रकाश कोकजे, अनिल धारकरी, राज कोकजे विद्या बोंबले उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow