संगमेश्वरचे माजी सभापती जयराम रामाणे यांचे निधन
साखरपा : संगमेश्वर तालुक्याचे माजी सभापती व तिवरे मेढे गावचे सुपुत्र जयराम गोविंद रामाणे (७३) यांचे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
सभापती म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत चांगली राहिली आहे. सहा वर्षांपूर्वी लकवा झाल्यानंतर ते आजारी होते. मुंबई येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पार्ले येथील युनायटेड इंक या नामांकित कंपनीमध्ये त्यांनी प्रशासकीय विभागामध्ये काम केले. वीस वर्षांपूर्वी त्यांनी दाभोळे पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 09-08-2024
What's Your Reaction?