चिपळूण : वालावलकर रुग्णालयात न्यूरो सर्जरी विभाग कार्यरत

Aug 7, 2024 - 17:02
 0
चिपळूण : वालावलकर रुग्णालयात न्यूरो सर्जरी विभाग कार्यरत

चिपळूण : अपघाताचे वाढते प्रमाण, मेंदूच्या इजा, ब्रेन ट्यूमर्स याचे प्रमाण पाहता डेरवण येथील भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात मेंदूवरील शस्त्रक्रिया विभागाची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. 

या विभागाचे प्रमुख डॉ. मृदुल भटजीवाले यांनी डी. आर. एन. बी. न्यूरो सर्जरी अशी पदवी नारायण हृदयालय या बंगलोरमधील प्रसिद्ध रुग्णालयामधून मिळवली आहे. त्यांचे एमबीबीएस हे शिक्षण केईएम मुंबई येथून झाले आहे. डब्ल्यू.आय.आय.एन.एस, कोल्हापूर या प्रीमियर संस्थेमध्ये त्यांचा कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी अपघातानंतर मेंदूला मार लागल्यास रुग्णाला कोल्हापूर किंवा मुंबई गाठावे लागत असे पण आता या सुविधा वालावलकर रुग्णालयात मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळणे शक्य आहे. 

कोकणातील रुग्णांनी नाव नोंदणी सचिन धुमाळ यांच्याकडे करावी. या संदर्भातील डॉ. मृदुल भटजीवाले दर मंगळवार ते रविवारी रोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ ह्या वेळेत रुग्णांची तपासणी करतील, अशी माहिती डेरवण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:31 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow