मुख्यमंत्री अत्रपूर्णा योजना : रत्नागिरी जिल्ह्यातील ९० हजार महिलांना मोफत गॅस सिलिंडर

Aug 9, 2024 - 10:40
Aug 9, 2024 - 10:48
 0
मुख्यमंत्री अत्रपूर्णा योजना : रत्नागिरी जिल्ह्यातील ९० हजार महिलांना मोफत गॅस  सिलिंडर

रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीन सिलिंडर शासन भरून देणार आहे; मात्र, या लाभार्थ्यांना एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलिंडरसाठी अनुदान दिले जाणार नाही. जिल्ह्यातील ९० हजार ४५२ उज्वलांना ३ मोफत गॅस मिळणार आहेत. शासन गरीब कुटुंबाना वार्षिक ३ सिलिंडरचे मोफत पुनर्भरण करून देण्यासाठी मुख्यमंत्री अत्रपूर्णा योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थानी मिळणार आहे. १ जुलैला पात्र होणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका पात्र ठरणार नाहीत.

जिल्ह्यात उज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी दिलेल्या ९० हजार ४५२ लाभार्थ्यांना शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. या वार्षिक लाभार्थ्यांना ३ गॅस सिलिंडर मोफत भरून  दिले जाणार आहेत. माझी लाडकी बहीण योजनेसाठी २ लाख १३ हजार ६७६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे या योजनेच्या निकषात बसणाऱ्या पात्र महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला लाभार्थीच्या नावे गॅसजोडणी असणे अनिवार्य आहे. जोडणो नावावर असेल तरच त्या महिलेला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री अत्रपूर्ण योजना शासनाने गरीब कुटुंबासाठी जाहीर केली आहे. यात उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षातून तीनदा मोफत सिलिंडर भरून दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील ९० हजार ४५२ लाभार्थीना वा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या लाभार्थ्यांना लाभ मिळू शकेल मात्र त्या महिलेच्या नावावर गॅस जोडणी असेल तरच ती महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. - रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow