दापोली : पाच कोटींच्या फसवणुकीतील सूत्रधाराला अटक

Aug 16, 2024 - 10:42
Aug 16, 2024 - 10:45
 0
दापोली : पाच कोटींच्या फसवणुकीतील सूत्रधाराला अटक

दापोली : शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून दापोली तालुक्यातील १७ गुंतवणूकदारांची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणातील मुख्य संशयित सूत्रधाराला दापोली पोलिसांच्या पथकाने बंगळूरू येथून अटक केली. सूत्रधार हर्ष काताळकर (वय २८) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचनदी येथील निवृत प्राथमिक शिक्षिका मनीषा विलास मालगुंडकर यांच्या घराच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील्स बसवण्यासाठी २०२०-२९ मध्ये जालगाव येथील संजय व राज काताळकर आले होते त्यांनी मालगुंडकर यांना आम्ही आमचा पुतण्या हर्ष याच्याबरोबर शेअर बाजारात गुंतवणूक करतो व भरपूर पैसे मिळवतो, असे सांगत आमच्याकडे तुम्हीही गुंतवणूक करा, असे सांगितले, मालगुंडकर यांच्या मुलाने या संदर्भात खातरजमाही केली हर्ष व जय अजय काताळकर, देव संजय काताळकर, संजय अनंत काताळकर, राज संजय काताळकर (सर्व रा. जालगाव) यांनी त्यांचा विश्वास संपादन करून तुमचे पैसे बुडगार नाहीत, तुम्हाला चांगला फायदा होईल असे सांगितल्याने मालगुंडकर यांनी २५ मे २०२३ ला व वेळोवेळी २३ लाख रुपये त्यांच्या बँकखात्यात पाठवले. दरम्यान, हर्ष काताळकर याने फायदा झाला असे सांगून १ लाख ७४ हजार रुपये परतावाही दिला.

त्यानंतर मालगुंडकर यांच्या मुलानेही ८ लाख तर विलास यांनी २ लाख रुपये हर्ष काताळकर याच्या खात्यात जमा केले. अशा प्रकारे हर्ष काताळकर याने दापोली तालुक्यातील अन्य १४ जणांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो, असे सांगून एकूण ४ कोटी ९९ लाख रुपये जमा करून घेतले. त्यानंतर चांगला परतावा तर नाहीच मूळ रक्कमही परत न मिळाल्याने अखेर मालगुंडकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात हर्ष व जय अजय काताळकर, देव संजय काताळकर, संजय अनंत काताळकर, राज संजय काताळकर यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. या सर्वांवर गुन्हाही दाखल करण्यात आला; मात्र यातील प्रमुख सूत्रधार हर्ष काताळकर (वय २८) हा १५ सप्टेंबर २०२३ पासून दापोलीबाहेर पळून गेला होता. पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगधर यांनी हर्ष याला बंगलुरू येथून अटक करून दापोलीत आणले. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow