खेडमध्ये डास प्रतिबंधक फवारणी

Aug 9, 2024 - 12:02
Aug 9, 2024 - 12:31
 0
खेडमध्ये डास प्रतिबंधक फवारणी

खेड: शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता नगरपालिका सतर्क झाली आहे. शहरात डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या ठिकाणांसह 'डोअर टू डोअर' डास प्रतिबंधात्मक फवारणी मोहीम गतिमान करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले व नगरपालिकेचे कर्मचारी डेंगीच्या साथीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी जंतूनाशक फवारणी करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांना पावसाचे पाणी साचणारे डबके बुजवण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मटण-मच्छी मार्केट परिसरासह साठेमोहल्ला, कोष्टीआळी, बाजारपेठ, वाणीपेठ, पोत्रिक मोहल्ला, शिवतररोड, पोलिस वसाहत या ठिकाणी डास फवारणीची मोहीम राबवण्यात आली आहे. नागरिकांनीही आपापल्या घरालगत साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची पैदास होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow