राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मानाच्या ‘राधाकृष्ण श्री 2024’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन

Aug 12, 2024 - 13:24
 0
राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मानाच्या ‘राधाकृष्ण श्री 2024’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मानाच्या ‘राधाकृष्ण श्री 2024’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा वैश्य युवा तर्फे घेण्यात येणार आहे.

रत्नागिरीतील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी वैश्य युवा अयोजित ‘राधाकृष्ण श्री 2024’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. हे या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे.  राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ रत्नागिरी येथे ही स्पर्धा होणार असून ही स्पर्धा 18 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. 

ही स्पर्धा चार गटात घेण्यात येणार आहे. किताब विजेत्याला रोख रक्कम 11000/- व आकर्षक शिल्ड देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटात 5 क्रमांक निवडण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 2000/-, 1500/-, 1000/-, 500/- ,500/-अशी रोख पारितोषिक व आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे. याशिवाय बेस्ट पोझर, व उगवता तारा यांचीही निवड करण्यात येणार आहे. त्यांना रोख रुपये 1000/- व आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे.

 सर्व स्पर्धकांना रात्रीचे जेवण आयोजकांमार्फत देण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्याबाहेरील स्पर्धकांना एकवेळच्या बसचा प्रवासखर्च दिला जाईल. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने घेण्यात येणार आहे. तरी जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र वणजू, सेक्रेटरी मकरंद खातु यांनी केले, स्पर्धेचे आयोजन वैश्य युवा ही संघटना करत आहे.तसेच स्पर्धेचे live प्रक्षेपण रत्नागिरी खबरदार चे संपादक हेमंत वणजू हे प्रायोजित करणार आहेत.

अधिक माहितीसाठी सदानंद जोशी 8668306148, जितेंद्र नाचणकर, तसेच वैश्य युवाचे स्पर्धा प्रमुख अथर्व शेटये 8329367647,सौरभ मलुष्टे, मनोहर दळी, सचिन केसरकर, मुकुल मलुष्टे, सुनिल बेंडखळे,कुंतल खातु, वेदांत मलुष्टे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपली नावे वेळेत देणे बंधनकारक आहे. 18 ऑगस्टला सायंकाळी 5.00 वाजता स्पर्धेच्या ठिकाणी हजर राहायचे अनिवार्य असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:52 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow