गुहागर : चुकलेल्या बिबट्याच्या पिल्लाची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी

Aug 12, 2024 - 13:54
 0
गुहागर : चुकलेल्या बिबट्याच्या पिल्लाची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवानगी

गुहागर : येथील उमराठ येथे शनिवारी (दि.3) बौद्धवाडीतील प्रशांत कदम यांच्या घराजवळ जंगलमय आडीतून आलेले बिबट्याचे पिल्लू आढळले. १५ दिवसांच्या आतील छोटेसे बिबट्या वाघाचे पिल्लू ओरडत असताना प्रशांत कदम यांना दिसले. जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसात स्थलांतर करताना ते चुकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यानंतर रविवारी (दि.४)गुहागर वनविभाग अधिकारी यांना प्रशांत कदम आणि उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानुसार सोमवारी (दि.५) वनविभाग अधिकारी येऊन त्या पिल्लाला घेऊन गेले. परंतु ते पिल्लू छोटे असल्यामुळे त्याची देखभाल करण्यासाठी अडचणी येत होत्या. वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन त्या बछड्याला वाघीण पुन्हा घेऊन जाईल अशा हिशेबाने मंगळवारी संध्याकाळी पुन्हा वनविभाग अधिकाऱ्यांची टिम त्या बछड्याला घेऊन घटनास्थळी आले. यानंतर त्याला वनविभागाने मुंबई बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) येथे रवानगी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow