राज्यात आतापर्यंत पडला १२३% पाऊस

Aug 12, 2024 - 17:05
 0
राज्यात आतापर्यंत पडला १२३% पाऊस

मुंबई : राज्यभरात सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी चालू हंगामात ११ ऑगस्टअखेर १२३.९ टक्के पाऊस झाला आहे. या काळात सरासरी ६४० मिलिमीटर पाऊस होतो.

यंदा तो ७९२.८ मिलिमीटर झाला आहे. नागपूर विभागात सर्वाधिक १३३.५ टक्के, तर तर सर्वात कमी नाशिक विभागात १०८.९ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसाळा १ जून ते १ सप्टेंबरपर्यंत असतो. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

धरणांमध्ये ७ टक्के जादा पाणीसाठा

राज्यात मोठे, मध्यम आणि लघु, अशी एकूण २,९९७ धरणे आहेत. त्यांची क्षमता ४८,२५४.८३ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या धरणांमध्ये ६७.५० टक्के म्हणजेच ३५,०२१. ६५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ६०.५५ टक्के होता. कोकण विभागातील १७३ धरणांमध्ये सर्वाधिक ८९.२० टक्के, तर सर्वात कमी छत्रपती संभाजीनगर विभागात २६.४५ टक्के पाणीसाठा आहे. पावसाळा सप्टेंबरपर्यंत असल्याने पाणीसाठ्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.

विभागनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

विभाग सर्वसाधारण प्रत्यक्ष टक्केवारी
कोकण १९९८.३ २४५०.३ १२२.६
नाशिक ४२८.२ ४६६.१ १०८.९
पुणे ६१३.६ ७१४ ११६.४
छ. संभाजीनगर ३८८.८ ४५४.७ ११६.९
अमरावती ४६९.४ ५५६.५ ११८.६
नागपूर ६७२.८ ८९८.३ १३३.५

१०५.७ मिमी - जून महिन्यात
१४४.८ मिमी - जुलै महिन्यात
९२.९% - ऑगस्टच्या ११ दिवसांत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow