रत्नागिरी : महिला लोकशाही दिन १९ रोजी
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. ऑगस्ट २०२४ चा महिला लोकशाही दिन १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नांबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशा महिलांच्या सोयीच्या दृष्टीने, जिल्ह्यातील महिलांना प्रायोगिक तत्त्वावर फोनद्वारे संपर्क करून १९ ऑगस्ट रोजीच्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालयातील १०७७ या टोल फ्री क्रमांकावर दुपारी १२ ते १ या वेळेत त्यांचे निवेदन / अर्ज नोंदविता येतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 12-08-2024
What's Your Reaction?