लांजा तालुक्यातील महिलांसाठी श्री क्षेत्र मार्लेश्वर दर्शन मोफत बससेवा सुरु

Aug 13, 2024 - 10:30
 0
लांजा तालुक्यातील महिलांसाठी  श्री क्षेत्र  मार्लेश्वर दर्शन मोफत बससेवा सुरु

लांजा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्या संकल्पनेतून श्रावणी सोमवार निमित्त लांजा तालुक्यातील महिलांसाठी मोफत मार्लेश्वर दर्शन बस फेऱ्या सुविधा सुरू करण्यात आली आहे. सोमवारी या सुविधेचा शुभारंभ महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने झाला. श्रावण महिना सुरू असून श्रावणी सोमवार निमित्त भक्त-भाविकांना श्री मार्लेश्वर दर्शन घडावे यासाठी अजित यशवंतराव यांनी हा पुढाकार घेतला आहे. 

श्रावणी सोमवार निमित्त केवळ लांजा तालुक्यातील श्री शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत असतात. मात्र, मार्लेश्वर दर्शन घेता येत नसे. सुप्रसिद्ध देवस्थान श्री मार्लेश्वर दर्शन महिलांना श्रावणी सोमवारी घडावे, यासाठी अजित यशवंतराव यांनी ही संकल्पना योजिले राबवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लांजा यांच्या नियोजनातुन आणि लांजा बस आगार यांच्या सहकायनि फक्त महिलांसाठी मार्लेश्वर दर्शन विशेष बस फेऱ्या सुरू असणार आहे. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी महिलां भक्तांची मागणी असेल त्या प्रमाणे बस सुविधा असणार आहे.

श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. श्री मार्लेश्वर दर्शन या सुविधेचा शुभारंभ सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लांजाचे उपाध्यक्ष संजय खानविलकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढून लांजातून पहिली बस फेरी देवस्थान मार्लेश्वर कडे रवाना झाली. तालुक्यातील महिलांनी लाभ घेऊन मार्लेश्वर दर्शन घेतले. यावेळी तालुकाध्यक्ष अभिजीत राजेशिर्के, उपाध्यक्ष संजय खानविलकर, शहर अध्यक्ष दिपक शेट्ये, स्मिता दळवी, शहराध्यक्षा मानसी कोपरे, राजेश झोरे, संजय बुरटे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow