राज्यस्तरीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ होणार सहभागी

Aug 13, 2024 - 10:51
 0
राज्यस्तरीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ होणार सहभागी

रत्नागिरी : १७ वर्षे वयोगटातील राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुली सन २०२४-२५ चे आयोजन महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशनतर्फे मुंबई येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा फॉइल, ईप्पी व सेवर या ३ प्रकारात घेण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे.

या स्पर्धेच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा फेन्सींग असोसिएशनने दि. १ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी व जिल्हास्तरीय स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, येथे आयोजित केली होती. या निवड चाचणीमधून रत्नागिरी जिल्हा संघामध्ये मुली फॉईल प्रकार १. श्रिया झोरे २. दुर्वा टिळेकर. ३. आदिती देसाई. ४. वेदा शिंदे, ईप्पी प्रकार १. तीर्था सावंत २. दुर्वा टिळेकर. ३. वेदा शिंदे. ४. नारायणी कवितके. सेबर प्रकार आदिती दिनेश देसाई.

मुले : ईप्पी प्रकार १. प्रार्थन कामेरकर, २. श्लोक सैतवडेकर ३. प्रसाद नागे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंचे क्रीडाधिकारी विजय शिंदे, सुरेश साळवी, मुकेश गुंदेजा, समिधा झोरे यांनी अभिनंदन केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow