लांजातील ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर हजर नाही झाला तर जिल्हा शल्यचिकित्सक दालनाबाहेर आंदोलन करणार; आ. राजन साळवींचा इशारा

Jun 3, 2024 - 11:02
Jun 3, 2024 - 12:19
 0
लांजातील ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर हजर नाही झाला तर जिल्हा शल्यचिकित्सक दालनाबाहेर आंदोलन करणार; आ. राजन साळवींचा इशारा

लांजा : लांजा तालुक्यातील महामार्गावरील ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून, रविवारपर्यंत ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर हजर नाही झाला तर जिल्हा शल्यचिकित्सक दालनाबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार राजन साळवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांना दिला.

या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांची भेट घेऊन चर्चा केली.

राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा तालुका असलेल्या लांजा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत यापूर्वी देखील आमदार राजन साळवी यांनी आंदोलन करून एमबीबीएस डॉक्टरांची मागणी केली होती. त्यानुसार त्यावेळी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर उपलब्ध करून दिला होता, परंतु, डॉक्टर निघून गेल्यामुळे रुग्णालयात आता सध्या एमबीबीएस डॉक्टर नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत असून, याबाबत शनिवारी आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच रविवारपर्यंत लांजा ग्रामीण रुग्णालयास एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून न दिल्यास आपल्या दालनाच्या बाहेर आंदोलनास बसण्याचा इशारा दिला. रत्नागिरी येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याबरोबरील चर्चेमध्ये लांजा ग्रामीण रुग्णालयास एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून ते रूजू होतील, असे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 03/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow