रत्नागिरी : कासव वगळण्याचे उपकरण वापरण्यासंदर्भात मच्छीमारांना प्रशिक्षण

Jun 18, 2024 - 15:22
Jun 18, 2024 - 17:24
 0
रत्नागिरी : कासव वगळण्याचे उपकरण वापरण्यासंदर्भात मच्छीमारांना प्रशिक्षण

रत्नागिरी : कोळंबी पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॉल जाळ्यांना कासव वगळण्याचे उपकरण न लावल्यामुळे भारतातून होणाऱ्या सागरी कोळंबी निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. यामुळे सुमारे साडेचार हजार कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे. हे टाळण्यासाठी महाराष्ट्रात कासव वगळण्याचे उपकरण वापरण्यासंदर्भातील चाचण्या सुरू होणार आहेत. चौदा बंदरांवरील मच्छीमारांना या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हीं, दाभोळ, मिरकरवाडा, साखरीनाटे या चार बंदरांचा समावेश आहे.

समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (एम्पीडा) भारतातून निर्यात होणाऱ्या सागरी कोळंबीबाबत अमेरिकेकडून घातलेल्या निर्बंधांची माहिती दिली होती. भारतात सागरी कोळंबीची मासेमारी ही प्रामुख्याने ट्रॉल जाळ्यांच्या आधारे होते. अमेरिकेच्या कोळंबी निर्यातीच्या नियमांप्रमाणे ट्रॉल जाळ्यांमध्ये कासव वगळण्याचे साधन लावणे बंधनकारक आहे. कारण, ट्रॉल जाळे हे समुद्रतळाला खरडवून मासे पकडते, समुद्रतळ हे सागरी कासवांचे अधिवास क्षेत्र असल्यामुळे बहुतांशवेळा त्यात ही कासवे अडकली जातात. प्रसंगी त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे कासवांना जाळ्यांमधून निसटण्यासाठी हे यंत्र मदत करते. यंत्रासंबंधीच्या नियमाची पडताळणी करण्यासाठी २०१९ ला अमेरिकेचे एक पथक भारतात आले होते. त्यांनी ओरिसा, तामिळनाडूबरोबरच महाराष्ट्रातील अर्नाळा बंदरावरही पाहणी केली होती. त्या पाहणीत कासव वगळण्याचे साधन ट्रॉल जाळ्यांमध्ये लावलेले आढळले नाही.

त्यामुळे निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. या उपकरणाच्या चाचण्या अमेरिकन तज्ज्ञ उपस्थितीत कोची येथील सुमद्रात फेब्रुवारीत पार पडल्या आहेत. महाराष्ट्रात या चावण्या आणि ट्रॉल जाळीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना या उपकरणासंबधीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात होणार आहे. भाऊचा धक्का, अलिबाग, वर्सोवा, ससून बंदर, करंजा, साखर-अक्षी, रेक्स, जिवना, हणें, दाभोळ, मिरकरवाडा, साखरीनाटे, देवगड आणि मालवण येथे या चाचण्या आणि प्रशिक्षण होणार आहेत. या उपकरणाची किंमत साधारण जाळीसकट २० हजार रुपये आहे.

मच्छीमारीवर नियंत्रण राहणे आवश्यक आहे. तसे वेळीच झाले तर कोळंबी निर्यातीविषयी निर्माण आलेला प्रश्न भविष्यात उद्भवणार नाही. त्यासाठी वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे. यंदा विविध कारणांमुळे कोळंबी निर्यातीत ५० टक्के तोटा सहन करावा लागलेला आहे. श्रीकांत जोशी, निर्यातविषयक अभ्यासक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:48 PM 18/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow