संगमेश्वर : शिंदे आंबेरीतील पाझर तलाव अपूर्णच; शेतकऱ्यांसह मनसे करणार ठिय्या आंदोलन

Aug 10, 2024 - 14:24
 0
संगमेश्वर : शिंदे आंबेरीतील पाझर तलाव अपूर्णच; शेतकऱ्यांसह मनसे करणार ठिय्या आंदोलन

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील शिंदेआंबेरी येथे चौदा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून पाझर तलावाचे काम हाती घेण्यात आले; मात्र चौदा वर्षांनंतरही या तलावाचे काम आजही अपूर्ण आहे. या तलावासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना आजतागायत त्याचा मोबदलाही मिळालेला नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जितेंद्र चव्हाण आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत कामाची चौकशी करावी. 

शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला न मिळाल्यास त्या पाझर तलावावरच १४ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिंदे आंबेरी येथे पाण्याची गरज व शेती व्यवसायाचा विचार करून शासनाच्यावतीने पाझर तलावासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून २००९ ला ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या पाझर तलावाचे काम सुरू करण्यात आले; मात्र आजतागायत हे काम अपूर्णच आहे. या तलाववासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या. 

त्यांनाही आजतागायत मोबदला मिळालेला नाही, मृद व जलसंधारण विभागाकडून शासनाच्या नियमानुसार, १४ वर्षांनंतरही भूसंपादनाची कार्यवाही केली नसल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. काही वर्षांपूर्वी हा पाझर तलाव फुटून तलावाच्या पायथ्याजवळ शेतीचे नुकसान झाले होते. गेली चौदा वर्षे जमिनी गेलेले शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत असून संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामाची तत्काळ चौकशी करून कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा १४ ऑगस्टपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह पाझर तलावावरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जितेंद्र चव्हाण यांनी दिला आहे. या वेळी रामचंद्र किंवलकर, देवेंद्र फडकले आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते,

चौदा वर्षे प्रतीक्षाच
चौदा वर्षांनंतरही या तलावाचे काम आजही अपूर्ण आहे. या तलावासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना आजतागायत त्याचा मोबदलाही मिळालेला नाही. याबाबत महाराष्ट्र नववनिर्माण सेनेच्यावतीने जितेंद्र चव्हाण आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत कामाची चौकशी करावी. शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला न मिळाल्यास त्या पाझर तलावावरच १४ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow