मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी १८ विशेष ट्रेन सेवा चालविण्याचा निर्णय

Aug 14, 2024 - 12:40
 0
मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी १८ विशेष ट्रेन सेवा चालविण्याचा निर्णय

मुंबई : ध्य रेल्वे प्रवांशाच्या लाँग वीकेंडची अतरिक्त गर्दी लक्षात घेऊन १८ विशेष ट्रेन सेवा चालवणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते नागपूर

लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते मडगाव

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते कोल्हापूर

पुणे ते नागपूर आणि

कलबुरगि ते बेंगळुरू

तपशील खालीलप्रमाणे आहे:

१) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष (२ सेवा)

02139 वातानुकूलित अतिजलद विशेष दि. १५.०८.२०२४ (गुरुवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ००.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

02140 वातानुकूलित अतिजलद विशेष दि. १६.०८.२०२४ (शुक्रवार) रोजी नागपूर येथून १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

संरचना : एक वातानुकूलित-प्रथम श्रेणी, ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ पँट्री कार (बंद अवस्थेत) आणि २ जनरेटर कार.

२) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - मडगाव विशेष (४ फेऱ्या)

01167 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दि.१५.०८.२०२४ (गुरुवार) आणि दि. १७.०८.२०२४ (शनिवार) रोजी २१.०० वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

01168 विशेष मडगाव येथून दि. १६.०८.२०२४ (शुक्रवार) आणि दि. १८.०८.२०२४ (रविवार) रोजी १२.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर (फक्त 01168 साठी), खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड (फक्त 01168 साठी), संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे (फक्त 01168 साठी), राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (फक्त 01168 साठी), आणि कणकवली

संरचना : २ वातानुकूलित -द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणी १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२२ डब्बे)

३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर विशेष (२ सेवा)

01417 विशेष गाडी दि. २०.०८.२०२४ (मंगळवार) रोजी ००.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

01418 विशेष गाडी दि. १८.०८.२०२४ (रविवार) रोजी २२.०० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा)

थांबे : कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज.

संरचना: २ वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅन ८ जनरल सेकंड क्लास.

४) पुणे - नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष (४ सेवा)

02143 वातानुकूलित अतिजलद विशेष दि. १५.०८.२०२४ (गुरुवार) रोजी पुणे येथून १६.१० वाजता सुटेल आणि दि. १७.०८.२०२४ (शनिवार) रोजी नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

02144 वातानुकूलित अतिजलद विशेष दि. १४.०८.२०२४ (बुधवार) आणि दि.१६.०८.२०२४ (शुक्रवार) रोजी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

संरचना: १४ वातानुकूलित तृतीय आणि २ जनरेटर कार.

५) कलबुर्गी - बेंगळुरू विशेष (६ सेवा)

06534 विशेष दि. १५.०८.२०२४ (गुरुवार), दि. १७.०८.२०२४ (शनिवार) रोजी कलबुरगि येथून ०९.३० वाजता सुटेल आणि दि. १८.०८.२०२४ (रविवार) रोजी श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. (३ सेवा)

06533 विशेष गाडी दि. १४.०८.२०२४ (बुधवार), दि. १६.०८.२०२४ (शुक्रवार) आणि दि. १७.०८.२०२४ (गुरुवार) रोजी श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथून २१.१५ वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे ०७.४५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)

थांबे: शाहबाद, वाडी, यादगिर, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनि, गुंटकल, अनंतपूर, धर्मवरम आणि यलहंका

संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, १ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान आणि १ गार्डच्या ब्रेक व्हॅन ६ सामान्य द्वितीय श्रेणी

आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच सुरू आहे.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:08 14-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow