खेड : बिजघर येथे घरातून सोनसाखळ्या चोरीला

Jul 16, 2024 - 12:09
Jul 16, 2024 - 15:10
 0
खेड : बिजघर येथे घरातून सोनसाखळ्या चोरीला

खेड : तालुक्यातील बिजघर येथील एका घरातून दि. ३ रोजी अज्ञात चोरट्याने सोनसाखळी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रोहिणी रुपेश दोडेकर (३१ वर्षे, रा. बिजघर टाकेवाडी, ता. खेड, सध्या - कशेळी, भिवंडी, ता. जि. ठाणे) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार दिनाक २ जुलै रोजी नवीन युंदाई कंपनीची ओरा गाडी त्यांनी खरेदी केली होती. त्या गाडीची कुलदेवतेच्या समोर पूजा करण्याकरता मुंबई येथून चालकासह त्यांचे पती, मुलगा असे दि. ३ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता मौजे बिजघर टाकेवाडी येथे त्याच्या घरी आले होते. त्यावेळी घरामध्ये त्या व तिचे पती पूजेची तयारी करत असताना सकाळी १० वा. ते १०.१५ वाजण्याच्या मुदतीत बिजघर येथील त्यांच्या घराच्या हॉलमध्ये ठेवलेल्या पर्समधून दोन सोनसाखळ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 16-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow