गणवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड !

Aug 14, 2024 - 16:07
Aug 14, 2024 - 16:10
 0
गणवेश न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड !

खेड : विद्यार्थ्यांना पुस्तके, बूट मिळाले. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी गणवेश न मिळाल्याने चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गणवेश मिळणारच हे आश्वासन हवेत विरले आहे. पायातील बूट नवा आणि अंगावर गणवेश जुना, यामुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट व पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. शाळा सुरू होण्याअगोदरच शाळेत पुस्तके दाखल झाली. या पुस्तकांचे पहिल्याच दिवशी मोठ्या दिमाखात वितरण करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थीही आनंदित झाले होते. पहिली ते आठवीपर्यंतच्या बुटाचे पैसे शाळा समितीच्या खात्यावर जमा केले होते. त्यातून शाळांनी बूट खरेदी केले. अनेक शाळांनी शाळा सुरू होताच काही दिवसांत मुलांना बुटांचे वाटपही केले, मात्र, एका दिवसावर स्वातंत्र्य दिन आल्याने गणवेश मिळण्याच्या मावळल्या आहेत. त्यामुळे हतबल झालेले शिक्षक, नाराज असलेले विद्यार्थी- पालक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याअगोदर गणवेशाचे पैसे शाळा समितीच्या खात्यावर जमा केले जायचे. त्यानंतर संबंधित शाळा गणवेशाचे कापड खरेदी करून शिवायला देत असायचे किंवा सर्वांच्या पसंतीचा व चांगल्या दर्जाचा रेडिमेड गणवेश विकत घेऊन तो विद्यार्थ्यांना वाटायचे. प्रशासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश कसा मिळेल? यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक काळजी घ्यायचे. परंतु यावर्षी शासनाने गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्याचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला दिले होते. नव्या गणवेशाच्या आशेवर असलेल्या विद्यार्थ्यांची निराशा झाल्याने पुन्हा एकदा शिक्षण विभाग आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow