रत्नागिरी : निवळी घाटात मटका जुगारावर छापा

Aug 16, 2024 - 10:28
 0
रत्नागिरी : निवळी घाटात मटका जुगारावर छापा

रत्नागिरी : निवळी घाट येथे उघड्या चिऱ्याच्या शेडमध्ये विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ग्रामीण पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जयेंद्र बाबू कांबळे (वय ५०, रा. पांगरी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित जयेंद्र हे निवळी घाट येथे एका उघड्या चिऱ्याच्या शेडमध्ये मटका जुगार खेळ खेळत असताना सापडले. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow