चिपळूण : वहाळ फाट्यावर उड्डाणपूल खचला

Jun 19, 2024 - 10:10
 0
चिपळूण : वहाळ फाट्यावर उड्डाणपूल खचला

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वहाळ फाटा येथे उड्डाणपूल खचला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली आहे. सध्या जुन्या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. पावसाळा सुरू होताच वहाळ फाटा येथे उड्डाणपूल खचल्यामुळे ठेकेदार कंपनीचे निकृष्ट काम जनतेसमोर आले आहे. ठेकेदार कंपनीने खचलेल्या भागातील काँक्रीट फोडण्याचे काम हाती घेतले आहे. त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना म्हणून डांबरीकरण केले जाणार आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा काँक्रीट केले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली.

कामथेपासून पुढे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे काम वेगाने सुरू आहे. सावर्डे येथील रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केला आहे, कोंडमळा येथील रस्ता आणि उड्डाणपूल दोन्ही वाहतुकीसाठी खुले केले आहेत.

वहाळ फाटा येथील उड्डाणपूल यावर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, या ठिकाणी अनेक गैरसुविधा पहिल्यापासून कायम होत्या, उड्डाणपुलाच्या खालील भागात पावसाचे पाणी दरवर्षी साचत होते. त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून ये-जा करावी लागत होती. उड्डाणपुलाच्या समोरच सावर्डे पोलिस चौकी आहे. रस्त्यात भरणाऱ्या पाण्याचा पोलिसांच्या वाहनांनाही त्रास होत होता. मात्र, या विषयाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींन किंवा सामाजिक कार्यकत्यनि लक्ष दिले नाही. उड्डाणपुलाचे काम करताना मातीचा भराव टाकल्यानंतर पावसाळा संपेपर्यंत थांबणे अपेक्षित होते. तसे न करता मातीचा भराव टाकल्यानंतर त्यावर लगेचच काँक्रिटचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे पहिल्याच पावसात उड्डाणपुलाचे काम खचले. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आपले प्रताप झाकण्यासाठी त्या ठिकाणी डांबरीकरण केले. त्यानंतरही रस्ता खचला त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या जुन्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे.

वहाळ फाटा येथील उड्डाणपुलाचा रस्ता खचता आहे. पुलावरील वाहतूक बंद करून जुन्या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. खचलेल्या रस्त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow