खेड : भरणे येथील खवले मांजर तस्करीप्रकरणात आणखी एकाचा सहभाग

Aug 16, 2024 - 10:12
Aug 16, 2024 - 12:15
 0
खेड :  भरणे येथील खवले मांजर तस्करीप्रकरणात आणखी एकाचा सहभाग

खेड : भरणे येथील खवले मांजार तस्करीप्रकरणात वनविभागाच्या पथकाने आतापर्यंत चौघांच्या मुसक्या आवळत्या या तस्करीप्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

या संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व पथकाने कंबर कसली आहे. या संशयिताच्या अटकेनंतर खवले मांजराच्या हत्येसह तस्करीचे नेमके कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे. ५ महिन्यापूर्वी वनविभागाच्या पथकाने खवले मांजर तस्करीप्रकरणी आतिश अशोक सोनावणे (रा. बौद्धवाडी, तुळशी बुद्रुक), अनिल धोंडुराम जाधव (नागाव, महाड), राजेंद्र रघुनाथ मोरे (पोलादपूर) यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून खवले मांजरासह वाहतुकीसाठी वापरलेली वाहनेही हस्तगत केली होती. या प्रकरण गेल्या ५ महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या दत्ताराम शामा कोंडगे यालाही महाड येथील राहत्या घरातून वनविभागाच्या पथकाने गजाआड केले. या संशयिताची जामिन्स सुटका झाली.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow