रत्नागिरी : बंदररोड-सुवरेवाडीत हातभट्टी दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई

Aug 16, 2024 - 12:18
 0
रत्नागिरी : बंदररोड-सुवरेवाडीत  हातभट्टी दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : शहरातील बंदररोड-सुवरेवाडी येथे विनापरवाना हातभट्टीची दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत वृद्धाकडून साहित्यासह चार लिटर दारू जप्त केली. शहर पोलिसात संशयित वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश बाबल्या सुवरे (वय ६४, रा. बंदररोड- सुवरेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १३) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सुवरेवाडी येथील झोपडीच्या बाहेरील बाजूस निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुवरेवाडी येथे वृद्ध विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह २३० रुपयांची चार लिटर दारू पोलिसांनी जप्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow