राजापूर : शिवसेना (उबाठा) तर्फे १८ रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धा

Aug 17, 2024 - 11:34
Aug 17, 2024 - 14:35
 0
राजापूर : शिवसेना (उबाठा) तर्फे १८ रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धा

राजापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी पुरस्कृत शिवसेना व युवासेना राजापूर- लांजा-साखरपाकडून तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी स. १० ते सायं. ७ वाजेपर्यंत श्री पौलस्तेश्वर जुगारी मंदिर, लिंगायतवाडी, लांजा येथे होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश मोफत असून प्रथम येणाऱ्या १५ स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी १२ ऑगस्ट सायं. ५ पर्यंत संपर्क साधता येणार आहे. राजापूरसाठी केदार कदम (९१३७१४९६२१) तर लांजा व साखरपासाठी संजय सुर्वे (७९७२५९६८६२) यांच्याशी संपर्क साधावा, असे शिवसेना (उबाठा) व युवासेना तालुका यांच्यावतीने कळवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow