लांज्यात २० ला मंगळागौर श्रावणसरी

Aug 17, 2024 - 14:43
 0
लांज्यात २० ला मंगळागौर श्रावणसरी

लांजा : आमदार राजन साळवी पुरस्कृत तालुक्यातील महिलासांठी एक संस्कृती जपणारा मंगळागौर श्रावणसरी हा कार्यक्रम २० ऑगस्टला सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. 

संघामध्ये कमीत कमी ७ आणि जास्तीत जास्त १२ महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे. प्रत्येक संघाला कमीत कमी ७ मिनिटे आणि जास्तीत जास्त १५ मिनिटांमध्ये सादरीकरण करता येईल. प्रत्येक संघाला आकर्षक सन्मानचिन्ह देण्यात येईल. संघातील प्रत्येक महिलेला विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख १५ ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी लीला घडशी, छाया गागंण, दीपाली दळवी, पूर्वा मुळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow