Ladki bahin yojana: पुरुषाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा

Aug 17, 2024 - 15:09
 0
Ladki bahin yojana: पुरुषाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा

वतमाळ : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजना सध्या राज्यात चांगलीच चर्चेत असून विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सत्ताधारी व विरोधक या योजनेवरुन आमने-सामने आले आहेत.

राज्य सरकारच्यावतीने आज योजनेबाबतचा मोठा कार्यक्रम होत असून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील 70 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसेही जमा झाले असून महिलांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. मात्र, यवतमाळमध्ये (Yavatmal) एका पुरुषाच्या बँक खात्यात (Bank) 3 हजार रुपये जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये लाडक्या बहीणऐवजी पुरुषाच्या खात्यात जमा झाले होते. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे हा प्रकार घडला असून जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे जाफर शेख याने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदा या बॅक खात्यात या योजनेचे 3 हजार रुपये शासनाने जमा केले होते.

या प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आधार कार्डच्या नंबरमुळे असे झाले असावे. आधार कार्डवर बारा अंकी नंबर असून यात पैसे जमा करतेवेळी शेवटचे चार अंक दिसून येतात. त्यामुळे आधीच्या एखाद्या नंबरमध्ये घोळ झाला असावा, या कारणाने संबंधित तरुणाच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. आम्ही राज्य टेक्निकल टीमकडून याबाबतची माहिती मागविली आहे. जी कोणी महिला या निधीपासून वंचित आहे, त्या महिलेचा शोध घेतल्या जात आहे. हा अर्ज राज्यातून कुठून भरला गेला, याची देखील माहिती मागविली असल्याचं पत्की यांनी स्पष्ट केलं.

बँक स्टेटमेंटनंतर पुरुषाने दिली कबुली

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यात या योजनेचे 3 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसाच एक मेसेज मला सुद्धा आला आहे. माझ्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाल्याचा हा मेसेज आहे. बँक ऑफ बडोदामध्ये माझं खातं आहे. मी हे खातं 2012 ला उघडलं होतं. पंरतु माझ्या गावापासून ते खूप दूर असल्या कारणाने मी व्यवहार करत नाही. परंतु मेसेज आल्यानंतर मी यवतमाळला आलो. इथे आल्यानंतर मी खात्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी करावी लागेल असं सांगण्यात आलं. परंतु मी व्यवस्थापकांना सांगून मी स्टेटमेंट घेतलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. मी कोणताही अर्ज केलेला नाही तरी पैसे माझ्या खात्यात कसे जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow