रत्नागिरीत  चंद्रशेखर टिळक यांचे २१ ला व्याख्यान

Aug 19, 2024 - 11:03
Aug 19, 2024 - 14:02
 0
रत्नागिरीत  चंद्रशेखर टिळक यांचे २१ ला व्याख्यान

रत्नागिरी : गुंतवणूक हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा आणि तितकाच गरजेचा विषय ! योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर असते. पण कुठे ? आणि कशी ? याबाबत मार्गदर्शन करणारे व्याख्यान रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने आयोजित केले आहे. येत्या बुधवारी (ता. २१) सायंकाळी ६ वाजता अर्थतज्ज्ञ, व्याख्यानकार, लेखक आणि कवी चंद्रशेखर टिळक हे गुंतवणूक: २०२४ आणि नंतर.. यावर व्याख्यान देतील.

गुंतवणुकीबाबत निर्णय घेताना अनेक घटकांचा चहुबाजूंनी विचार करणे आवश्यक असते.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, राजकीय निर्णय, पैशाची उपलब्धता, गुंतवणूकदारांची मानसिकता हे अनेक घटक गुंतवणुकीवर परिणाम करणारे असतात. याबाबत व्याख्यानाच्या माध्यमातून अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक अधिक मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाला जास्तीत जास्त रत्नागिरीकर, विद्यार्थी, बँका, पतसंस्था, आर्थिक आस्थापना यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:01 PM 8/19/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow