ऑनलाईन वाट शोधणारा ट्रक उक्षी घाटात भरकटला

Aug 20, 2024 - 10:18
Aug 20, 2024 - 14:23
 0
ऑनलाईन वाट शोधणारा ट्रक उक्षी घाटात भरकटला

रत्नागिरी : ऑनलाईन वाट शोधणे एका ट्रक चालकाला चांगलेच महागात पडले. मुंबई गोवा महामार्गावर निवळी मानें उक्षी घाटातून प्रवास करताना टूक तीन वेळा अडकल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान राखात ब्रेक लावत गाडीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारण बाजून सुमारे ४०० फूट खोल दरी होती

मुंबई गोवा महामार्गावर घटना काल (ता. १९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रक बाजूला करण्याचे प्रयत्न उक्षी ग्रामस्थांकडून सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार टूक (क्र. आरजे १४ जीओ १३१५) मुंबईच्या दिशेने जात होता. निवळी येथे आल्यानंतर चालकाने ऑनलाईन नकाशाचा आधार घेतला. मात्र उक्षी घाटातून हा ट्रक जाईल की नाही याची नवशिक्या ट्रक चालकाला माहिती नव्हती. उक्षी घाटातून जाताना एका अवघड वळणावर तो फसला. त्यामुळे दोन्ही बाजुला वाहतूक खोळंबली होती. मात्र तेथील ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी आजुबाजुची झाडी तोडून मार्ग मोकळा केला.

थोड्या वेळाने ट्रक मार्गस्थ झाला. मात्र पुन्हा एका वळणावर वळण घेताना खोल दरीत जाता-जाता बचावला, त्यानंतर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने तिसऱ्यावेळी पुन्हा एका वळागावर ट्रक अडकला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. इतर वाहनांचा खोळंबा झाल्याने हॉर्न वाजवून गौगाट केला, येथील ग्रामस्थांनी वारंवार दिशादर्शक फलक, माहिती फलक लावण्याची मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. या आधी सुद्धा एका खासगी बसचा अपघात या घाटात वळणाचा अंदाज न आल्यामुळे झाला होता. त्यानंतर एक गैस टैंकर इथे अडकला होता. आज पुन्हा तिच परिस्थिती मात्र संबंधित विभागाला अजूनही याचे गांभीर्य आलेले दिसत नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

मार्गावर फलक लावण्याची गरज
दिशादर्शक फलक, माहिती फलक लावण्याची मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. या आधी सुद्धा एका खासगी बसचा अपघात या घाटात वळणाचा अंदाज न आल्यामुळे झाला होता. त्यानंतर एक गॅस टँकर इथे अडकला होता. त्यामुळे फलकाबाबतची आवश्यक कार्यवाही संबंधित विभागाने तातडीने करावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:46 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow