संगमेश्वर : पाटगाव येथील गणेश साळवी यांचा 'लेक वाचवा' देखावा प्रथम

Sep 17, 2024 - 14:05
 0
संगमेश्वर : पाटगाव येथील गणेश साळवी यांचा 'लेक वाचवा' देखावा प्रथम

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील कडवई विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व युवासेना भूमिका यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित तालुकास्तरीय मखर सजावट स्पर्धेत पाटगाव येथील गणेश साळवी यांच्या लेक वाचवा या सामाजिक विषयावरील देखाव्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

या स्पर्धेत तालुक्यातील ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य ब्रीद, संकेत घेराडे, सागर भोजने, चेतन उजगावकर, महेंद्र मादगे, उल्हास घाणेकर, कौस्तुभ मयेकर यांनी घेतली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण लवकरच होईल, असे अजिंक्य ब्रीद यांनी सांगितले. या स्पर्धेत पहिला क्रमांक लेक वाचवा या देखाव्याला मिळाला आहे. द्वितीय क्रमांक कुचांबे येथील सुमित घेराडे यांच्या पंढरपूर दर्शन या देखाव्याला तर तृतीय क्रमांक संगमेश्वर येथील अभिषेक खातू यांनी साकारलेल्या केसरीवाडा प्रतिकृतीसाठी मिळाला, चौथा क्रमांक धामापूर येथील रोशन रामाणे यांच्या रामसेतू या देखाव्याला तर उत्तेजनार्थ रांगव येथील जगदीश धामणस्कर यांच्या कोकण रेल्वे देखाण्याला मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow