चिपळूण : शिरगावात ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी खा. नारायण राणे यांना साकडे

Sep 11, 2024 - 11:50
Sep 11, 2024 - 15:54
 0
चिपळूण : शिरगावात ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी खा.  नारायण राणे यांना साकडे

चिपळूण : तालुक्यातील शिरगाव ही पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ आहे. शिरगांवमधील प्राथमिक आरोग्यकेंद्राची जागादेखील मोठी असून प्रशस्त इमारत आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्यकेंद्राला ग्रामीण रुग्णालय श्रेणीत वाढ करून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय म्हणून विशेष मान्यता देण्यात यावी, अशी मागणी शिरगांव परिसरातील ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.

खासदार राणे यांना शिरगांव परिसरातील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, शिरगाव ही मोठी बाजारपेठ असून ग्रामस्थ, चाकरमानी आणि कामाधंद्यानिमित्त गावचे रहिवासी अशी १० हजारपर्यंत लोकसंख्या आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राची ४० गुंठे जागा असून आजूबाजूला ही खासगों मोकळी जागा उपलब्ध आहे. याचा थेट फायदा चिपळूण तालुक्यातील बसपटी विभाग व आजूबाजूच्या ५० ते ६० गावांना होणार आहे. सध्या तालुक्यात एकच कामथे ग्रामीण रुगालण आहे. ते दक्षिण भागातील गावांना खूप लांब पडते. शिरगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात शिरगाव, अलोरे, नागावे, पोफळी, मुंढे, तळसर, कुंभार्ली, कोडंफणसवणे, कोळकेवडी ही गावे व त्यांची उपकेंद्रे मोडतात. बहुसंख्य रहिवासी वैद्यकीय उपचारांसाठी शिरगांव प्राथमिक आरोग्यकेंद्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे गरजू गरीब रुग्णांची खूप मोठी गैरसोय होत आहे. या विभागात सर्प, विंचूदंश तसेच श्वान चावणे याचे प्रमाण खूप आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत गरीब रुग्णांची प्राथमिक उपचार, तपासणी करण्यास वैद्यकीय अधिकारी कधी उपलब्ध नसतात. पाटण, (जि. सातारा) ते चिपळूण या ६१ कि.मी. च्या अंतरामध्ये एकही ग्रामीण रुग्णालय उपलब्ध नाही. या मार्गामध्ये कुंभालों घाट लागतो. येथे अपघाताचे प्रमाण खूप जास्त आहे; परंतु पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सुविधा व तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना उपचारासाठी दुसरीकडे जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी शिरगांव प्राथमिक आरोग्यकेंद्राची दर्जा वाढ करून ग्रामीण रुग्णालयासाठी शिफारस करावी, अशी मागणी केली आहे.

नातेवाइकांना फटका
सर्वांत जास्त गावे चिपळूण दक्षिण भागात आहेत. हा भाग खूप दुर्गम आहे. त्यामुळे कामधे ग्रामीण रुग्णालयाचा फारसा उपयोग या भागातील लोकांना होत नाही. नाइलाजास्तव नागरिकांना आपले रुग्ण खासगी रुग्णालयात भरती करावे लागतात. त्याचा खूप मोठा आर्थिक भुर्दड रुग्णाच्या नातेवाइकांना सहन करावा लागतो.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:12 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow