राजापूर : जांभलवाडीतील श्री देव अंजनेश्वर ब्राह्मण देवाच्या भेटीला; श्रावणातील अखंडित परंपरा

Aug 21, 2024 - 11:11
 0
राजापूर :  जांभलवाडीतील  श्री देव अंजनेश्वर ब्राह्मण देवाच्या भेटीला; श्रावणातील अखंडित परंपरा

राजापूर : तालुक्याच्या पश्चिमेकडील बारा गावांचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री देव अंजनेश्वर मंदिर कसबा मिठगवाणे येथील देव दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दशक्रोशीतील एका गावात किंवा वाडीतील मंदिराच्या भेटीसाठी श्रावणदिंडीने नेण्यात येतो. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेली परंपरा यंदा सुरू आहे. त्यात जांभलवाडीतील श्री देव ब्राह्मणदेवाच्या भेटीसाठी श्रावणदिंडी काढण्यात आली.

पावसाने दडी मारल्यामुळे दिवसभर कडकडीत ऊन होते. या परिस्थितीही मोठ्या संख्येने भाविक या श्रावणदिंडीमध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर ताल धरत देवाच्या नामाचा गजर करत हो दिंडी गावात दाखल झाली. श्री देव अंजनेश्वराचे निशाण घेऊन विश्वस्त, मानकरी, भाविक, ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात सकाळी साडेआठच्या सुमारास वाजतगाजत बाहेर पडले. श्री देव अंजनेश्वरची घाटी, चाफेस्टॉप, चिरेखाणफाटा या मागनि जांभलवाडी येथे दाखल झाली. जांभलवाडीच्या सीमेवर ग्रामस्थांनी या श्रावणदिंडीचे जयघोषामध्ये स्वागत केले.

चिरेखाण स्टॉप येथे शिरवडकर बंधूंनी सरबत वाटप करत श्रावणदिंडीचे स्वागत केले. श्री देव ब्राह्मण देवाच्या मंदिरामध्ये श्रावणदिंडी पोहोचल्यानंतर या ठिकाणी 'ओम नमः शिवाय'चा गजर करत श्री देव अंजनेश्वर आणि श्री देव ब्राह्मण देवभेट घेतली. या वेळी जांभलवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रावणदिंडीतील भाविकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. श्रीदेव अंजनेश्वर देवस्थानच्या वतीने श्री देव ब्राह्मण देव मंदिराला तर श्री ब्राह्मण देव मंदिराकडूनही श्री देव अंजनेश्वर मंदिराला भेटवस्तू देण्यात आल्या, श्रावणदिंडीत सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे श्री देव अंजनेश्वर ट्रस्टच्या वतीने विश्वस्त डॉ. मिलिंद देसाई यांनी स्वागत केले. आज पावसाने पूर्णतः दडी मारल्यामुळे रखरखत्या उन्हातदेखील भाविकांच्या चेहऱ्यावर श्रावणदिंडीचा उत्साह आणि आनंद ओसांडून वाहत होता.

रखरखत्या उन्हातही गर्दी
श्रावणदिंडीत सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे श्री देव अंजनेश्वर ट्रस्टच्या वतीने विश्वस्त डॉ. मिलिंद देसाई यांनी स्वागत केले. काल पावसाने पूर्णतः दडी मारल्यामुळे रखरखत्या उन्हातदेखील भाविकांच्या चेहऱ्यावर श्रावणदिंडीचा उत्साह आणि आनंद होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow