रत्नागिरी : टपरीच्या आडोशाला जुगार; गुन्हा दाखल

Aug 22, 2024 - 14:11
 0
रत्नागिरी : टपरीच्या आडोशाला जुगार; गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील एसटी स्टँडसमोर एका हॉस्पिटलजवळील टपरीच्या आडोशाला चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी धाड टाकली. ही कारवाई मंगळवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सूरज गजानन सुवरे (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. 

त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल अमोल भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा एसटी स्टैंड समोरील एका टपरीच्या आडोशाला बेकायदेशीर मटका जुगार चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 22-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow