संजय सुर्वे यांना भजनरत्न पुरस्कार प्रदान

Aug 22, 2024 - 11:13
Aug 22, 2024 - 14:13
 0
संजय सुर्वे यांना भजनरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : भडे (ता. लांजा) गावचे सुपुत्र, भजनसम्राट बुवा संजय जनार्दन सुर्वे यांना समाजप्रबोधन व‌ देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे कला सादर केल्याबद्दल राजापूरचे आमदार राजन साळवी पुरस्कृत भजनरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संजय सुर्वे गेली अनेक वर्षे भजनकलेशी एकरूप झाले आहेत. वडील सुप्रसिद्ध भजनकार कै. जनार्दन सुर्वे यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच काका ज्येष्ठ भजनी बुवा प्रकाश सुर्वे व अशोक बुवा सुर्वे यांच वारसा चालवून अनेक भजन स्पर्धेत त्यांनी अव्वल मानांकन मिळवले आहे. डबलबारी भजन क्षेत्रात संपूर्ण कोकणभर आणि मुंबईत त्यांनी अनेक नामव़ंत भजनी बुवांबरोबर भजनांची डबलबारी केली आहे. पुरस्काराबद्दल संजय सुर्वे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हे यश माझे एकट्याचे नसून माझ्या आईबाबांची पुण्याई आणि गुरुमाऊली भजनसम्राट विजय बुवा परब यांच्या शुभाशीर्वादाने शक्य झाले. या यशात भजन मंडळाचाही सिंहांचा वाटा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 22-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow