रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शक; बँकेकडून प्रसिद्धी पत्रक जाहीर

Aug 23, 2024 - 10:29
Sep 4, 2024 - 15:57
 0
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शक; बँकेकडून प्रसिद्धी पत्रक जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्मचारी भरती प्रस्तावित असून, उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ९० मार्कसाठी ९० प्रश्न असणार असून हे प्रत्र ९० मिनिटांत ऑनलाईन पध्दतीने सोडवावयाचे असल्याची माहिती बँकेच्या वतीने प्रसिध्दी पत्रक काढून देण्यात आली.

बँकेच्या परिक्षेच्या तारखा, परीक्षा केंद्र याबाबतीत माहिती संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे उमेदवारांनी अवलोकित करायची आहे. ऑनलाईन पद्धतीने होणारी ही परीक्षा उमेदवारांच्या गुणवत्तेला पूर्ण संधी देणारी असणार आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवर विश्वास ठेवावा.

अकारण अन्य ठिकाणी प्रसिध्द होणाऱ्या बातम्या, होणाऱ्या चर्चा यामुळे विचलित होऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. चुकीच्या माहितीमुळे आपली दिशाभूल करून घेऊ नये. संकेतस्थळावर यूजर गाईडमध्ये असलेला प्रश्नसंच हा डेमो म्हणून दिला आहे. संपूर्ण पद्धती समजावी म्हणून ते एक उदाहरण आहे, अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवावा.

उमेदवारांनी या ऑनलाईन परीक्षेवर पूर्ण लक्ष केंद्रित करून ९० मार्कपैकी अधिकाधिक मार्क प्राप्स होतील अशी तयारी करून आत्मविश्वासाने ऑनलाईन परिक्षेला सामोरे जाऊन आपण यश संपादन करावे, असे त्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow